Entries by Jeevanrang

बुद्धिबळ

नमस्कार मित्रांनो, ऑफिसमध्ये एका विषयावर चर्चा रंगली… “कोणाला बुद्धिबळ खेळता येतो का ?” सुनिल दादा, मोहित दादा आणि मी. तिघांना बुद्धिबळ खेळता येतो पण मोहित आणि मी मोबाईल किंवा कॉम्पुटर वर खेळत असतो. सुनिल दादाने आवाज उचलाला बस्स.. आता बुद्धिबळ खेळायचा पण बुद्धिबळ पटावर. सुनिल दादाने बुद्धिबळाचा पट काढला आणि एक वेगळाच उत्साह संचारला. एका बाजूला सुनिल […]

कुठलंही काम सोपं करण्यासाठी वापरात येणारे सात ‘R’

जीवनरंगचे सवंगडी जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा विचारांची देवाण-घेवाण झालीच पाहिजे. अशाच एका मीटिंग नंतर भाईने एक पुस्तक माझ्या हातात ठेवलं आणि नक्की वाच असा आग्रह केला. (भाई म्हणजे आपली लाडकी सुनायना ताई. आम्ही एकमेकांना भाई नावाने हाक मारतो.) “फोकल पॉईंट” अतिशय सुंदर आणि उपयुक्त असं पुस्तक आणि या पुस्तकाचे लेखक ब्रायन ट्रेसी हे वैयक्तिक आणि […]

वाघा बॉर्डर परेड … एक अविस्मणिय संध्याकाळ

भारतीय लष्कराविषयी असलेला सार्थ अभिमान आपण सर्व भारतीयांमध्ये ओतपोत भरलेला आहे… त्यात जर ती भारत पाकिस्तान सीमेवरील वाघा बॉर्डर असेल तर तो अजून ओसंडून बाहेर येतो….. माझ्या आयुष्यात आलेला हा वाघा बॉर्डर स्टेडियमवरचा अतुलनीय, अभिमानास्पद क्षण………बॉर्डर,परेड, कवायती  व पलीकडले ‘ते’ लोक पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो मनात एक धाकधूक …..गाडीने जाताना लाहोर 23 किलोमीटर अशी […]

वाल्या कोळ्याची बायको

 रामायणा, रामा, लक्ष्मणा असे उच्चार करणाऱ्या नातीला परीक्षा सम्पल्या की शहाण करून सोडण्याचा आणि तीला समजतील अशा रामयणातल्या गोष्टी सांगायचा संकल्प मी ह्यावेळी पूर्ण केला. त्यासाठी माझी प्रचंड दमछाक झाली. वयाच्या जेमतेम सहाव्या, सातव्या वर्षी एव्हढे प्रश्न मुलांना पडू शकतात ह्या आश्चर्यातून मी अजूनही बाहेर आले नाहीये. इथे थातुरमातुर उत्तर देऊन चालणार नाही, हे लक्षात […]

मला कळू दे

नात्यामध्ये गैरसमज हा फार भयंकर असतो. नात्यामध्ये बऱ्याचदा आपण जे पाहतो किंवा ऐकतो ते संपूर्ण सत्य नसते. समोर जे घडेल त्याला आपण आपले अर्थ जोडतो आणि आपलं एक सत्य बनवतो. आपण बनवलेल्या या सत्यामधूनच आपण ते नातं पाहायला लागतो. चुकीच्या अर्थातून बनलेलं हे सत्य आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलं पाहूच देत नाही. आपण फक्त चुका शोधात […]

भावनिक बुद्धिमत्ता – भाग १

आपण जर पाहिले तर व्यक्तिमत्व विकासाचे स्वरूप भावनात्मक (Emotional), बोधात्मक (Intellectual) आणि क्रियात्मक (Practical) या  क्षेत्रांशी संबंधित असते. आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास होण्यासाठी व या तीन क्षेत्रातील विकासासाठी योग्य प्रमाणात प्रयत्न होणे आवश्यक आहे. आज आपण भावनात्मक म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ताच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत.   यासाठी सर्वप्रथम समजून घेऊया कि ‘भावना‘(Emotion) म्हणजे नक्की तरी […]

गेली ३३८ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी

रसिक वाचक, सप्रेम नमस्कार ! आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३३८ वी पुण्यतिथी ! या निमित्ताने , माझ्या आगामी *झंझावात* या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे. “माणसात पण देवत्वाचा अंश असतो” हे ग.दि.मांं. नी आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे :   ज्ञानियांचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, […]

पाऊस निघुनी गेला

मंडळी, मागे अचानक पडून गेलेल्या पावसाने वातावरण बदलून टाकलं. मी कामोठ्याला ट्रेन मधून उतरलो. पार्किंग मध्ये लावलेली बाईक घेवून रस्त्याला लागलो तसा थंड हवेचा शरीराला स्पर्श होऊ लागला. मातीच्या त्या नेहमीच हव्या वाटणाऱ्या सुगंधाने नवी चेतना माझ्यामध्ये भरली.  भिजलेले रस्ते, झाडे, पानांवर सर्व शक्ती एकवटून जिद्दीने टिकलेले पावसाचे थेंब, पागोळ्यांचे टीप टीप करत ओघळणारे पावसाचे […]

पहिला पाऊस

व्रुत्तपत्रातील त्या बातम्या. आज या भागात’वीज कपात’,’पाणी कपात’ तर उद्या त्या भागातील. गरम्यामुळे जीव नकोसा होत होता. बरं एवढी उष्णता वाढत होती की,घरात नुसतं बसणंही असह्य होत होतं. पण या सगळ्याचा रामबाण उपाय म्हणजे ‘पाऊस’ आणि त्याचीच तर कमतरता होती.   त्रुषार्त वसुधा डोळे वटारलेल्या भगवान सहस्त्र रश्मीकडे काकुळतीने पहात होती. निसर्गात एक प्रकारचा रुक्षपणा […]

नाते

असणं आणि माननं , दोन खरंच खूप वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा एखादी गोष्ट आहे किंवा एखादे नाते आहे असे आपण मानतो तेव्हा तिथे असतो फक्त विश्वास, तो ही एकतर्फी. कारण, हे तुमचे मत आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी असेलच असे नाही. आणि असणं हे निसर्गतः किंवा जन्मतः मिळालेलं असतं. इथे सुद्धा विश्वास असतो पण त्या जोडीला […]

धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

जयहिंद, सध्या वर्तमानपत्रात कथुआ, उन्नाव व अशा अनेक अशा बातम्या वाचल्या की मन विषण्ण होत. असं वाटत की यावर आपल्या देशात जी कारवाई होते ती बऱ्याचदा राजकारणी हेतूंमुळे तशी कमीच होते किंवा न्यायदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेत अनेकदा इतका वेळ जातो की आरोपी मोकाट सुटूनही जातो पण ज्या घरावर ही परिस्थिती ओढवलेली असते त्यांच काय? अनेकदा […]

तेजोनिधी लोहगोल

अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं— त्यातील रंगनाथचा एक मुलगा — श्रीधर — डाॅक्टर झाला.पण तो बहिरा होता.आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं.बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती.तिला कवितांची खूप आवड.रंगनाथ—शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला.उभयतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नांव ठेवलं सुरेश ! हळूहळू सुरेश मोठा होत होता.पण तो […]

शांती अंखडीत राहो… जगाचा भेद लयाला जावो ।।

राष्ट्र संत तुकडोजी महाराज राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. लहानपणापासूनच त्यांना ईश्वरभक्तीची पण आवड होती. भक्तीच्या माध्यमातून , मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांनी राष्ट्रभक्तीचे धडे समाजात रुजविली . माझ्या वडिलांनी संत तुकडोजी महाराजांची कांही भजनं डायरीत लिहून ठेवलेली आहेत.  आमच्याकडे श्रावण मासात एक महिना पूर्ण भजन करायचो.  त्यात  सर्व संतांची भजनं असायची.  चालीवर म्हणायचो.    ते […]

आर्थिक योजनांची आखणी न करण्याची सर्वसामान्य कारणे/बहाणे

आर्थिक नियोजन करताना सामान्यतः गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये, गुंतवणुकीचा कालावधी, धोका पत्करण्याची क्षमता, सुरक्षितता आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. मी आत्तापर्यंत अनेक गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन करताना पाहिलंय आणि काहींना आर्थिक नियोजन करण्यास सांगितले असता त्यांची काही कारणे वा बहाणे ऐकायला मिळतात. आज आपल्या या लेखामध्ये आपण “आर्थिक योजनांची आखणी न करण्याची सर्वसामान्य कारणे/बहाणे” पाहणार आहोत.   कारण […]

आयुष्य

मंडळी , आपल्यापैकी काही जणांना माझ्यासारखं सिनेमाचं आणि त्यातल्या त्यात संगीतकार , गायक व सिनेकलाकारांचं वेड असतं. आणि कधी कधी ते इतकं असतं की आयुष्याशी पण अशा सिनेकलाकारांची सांगड घातली जाते ! अशीच सांगड घालणारी एक कल्पना मांडली आहे ( ५ सप्टेंबर २००५ ला ! ) खालील कवितेत , बघा पटते का…..   आयुष्य आयुष्य तेंव्हा […]

 आयुर्वेद चिकित्सेनुसार षड्रिपू

या अखिल चराचर जगतामधे   प्रत्येक जीवंत प्राणिमात्रांमधे काही स्वाभाविक इच्छा दिसून येतात. ज्या वेळोवेळी आपल्याला जाणवतात. त्यांचे वेळेवर निराकरण करायलाच पाहिजे.उदा-भुक लागल्यावर जेवण करणे, तहान लागल्यावर पाणी पिणे, त्याचप्रकारे शिंका येणे, जांभई, झोप, वमन, अश्रू येणे, मल मुत्र वेग, श्वास वगैरे  हे झाले शारीरिक वेग. यांचे निराकरण वेळेवर न झाल्यास अनेक शारीरिक रोगांन ते कारणीभूत […]

समजूतदारपणा (सबमिसिव्ह लेव्हल)

आपल्या सर्वांमध्ये आपण कधीतरी एक वाक्य असतेच की अमक्या माणसाने एवढा तरी समजूतदारपणा दाखवायला हवा  होता?  आता  मला असा प्रश्न पडतो  की त्या माणसाने किंवा त्या व्यक्तीने नक्की काय करणे अपेक्षित होते. बरं  हे जरी बाजूला ठेवले तरी  समजूतदारपणा म्हणजे नक्की काय? तो कसा दाखवायचा ? म्हणजे नक्की काय करायचं हयाचा सगळया प्रश्नाचा फार बारकाईने […]

जे जे विदेशी आणि इंग्रजी ते ते उत्तम?

साधारण 70 ते 80 च्या दशकापासून सुरुवात झाली एक पिढी परदेशात जायला आणि मग हळू हळू विदेशी वस्तुंचा भारतात वापर वाढू लागला. जी गोष्ट अगोदर चैन म्हणून बघितली जायची ती आता गरज झाली किंवा त्याची गरज निर्माण केली गेली.   मग त्यानंतर या विदेशी वस्तूंची फॅशन झाली. एखाद्याने आश्चर्याने विचारले अरे नवीन घड्याळ! की त्यावर […]

कोण्या एका अनोळखी बेटावर जेव्हा फसलो मी

आपल्या जीवनात एक वेळ येते जेव्हा आपण परमोच्च सुख उपभोगत असतो, ‘जे चाललंय ते असंच चालू दे. हे बदलायला नको.’ असं आपल्याला वाटायला लागतं आणि अचानक काहीतरी घडतं आणि क्षणार्धात सगळं बदलून जातं. अत्यंत प्रयासाने घडवलेलं स्वप्नांचं जग आपल्या नजरेसमोर कोलमडून जातं. अशा परिस्थितीत काही लोक उध्वस्त होतात, तर काही लोक आपलं नवं जग घडवतात. […]

इतिहासातून इतिहास घडवा…

उद्योजक मित्रांनो, आपण खरोखरच अतिशय भाग्यशाली आहोत की आपण या पवित्र मातीत जन्म घेतला. आपल्या या मातीला अतिशय वैभवशाली आणि दैदीप्यमान इतिहास लाभलेला आहे. ‘या ओठांनी चुंबूंन घ्यावी हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी…‘ हे म्हणणं खरोखरच वावगं ठरू नये, इतका जबरदस्त वारसा या मातीचा आहे. हीच ती माती जिथे एका महत्त्वकांक्षी सरदारच्या […]

आलो मी हितगूज कराया

आदरणीय अण्णा ,   आज ५ जानेवारी २०१८…… तुम्हाला जाऊन आज बरोबर ३६ वर्षं झाली ! एका गोष्टीचं मला नवल वाटतं की तुम्हि स्वरांचे जादुगार म्हणून १२ जानेवारी १९१८ ला जन्म घेऊन आयुष्याच्या पटावरुन Exit पण घेताना बरोबर ७ दिवस आधी घेतलीत — हा निव्वळ योगायोग की भैरवीत ठरवून सात दिवसरुपी सात सूर कमीच लावलेत […]

आर्थिक नियोजनाचे तीन थर

माझ्या वाचनात एक मुद्दा आला होता तो तुमच्याशी शेअर करावा म्हणून… एखादी ३ मजली इमारत पाहिली आहे का ? अर्थातच हो! समजा तुम्ही त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एखादे काम चालू केले तर बहुद्या पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर त्याचा परिणाम तितकासा जाणवत नाही. परंतु तुम्ही पहिला मजला तोडला तर इमारत उध्वस्त होईल. तुम्ही म्हणाल हे होणारच! […]

आयुर्वेद समजूती आणि ग़ैरसमज़ूती – भाग ५

भाकरी… निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली… अरे संसार संसार… जसा तवा चूल्ह्या वर… आधी हाताले चटके… तवा मियते भाकर।।(बहीणाबाई चौधरी) तसा diet विषयाचा आणि या कवितेचा direct संबंध नाहीं… पण असं वाटत ज़र भाकरीच नसती तर बहीणा बाईंच्या या सुंदर ओळींना आपण मूकलो असतो का..?..म्हणजे हे सुद्धा एक भाकरीचे महत्वच म्हणलं पाहिजे… आता मूळ विषयाकड़े येवूया.. असा […]

आयुर्वेद समजुती आणि गैरसमजूती भाग -३

पृथिव्याम्  त्रीणि रत्नानि जलम् अन्नं सुभाषितम्…। मूढै: पाषाणखण्डेषु रत्न संज्ञा विधीयते ..। ( अर्थ: पृथ्वी वर केवळ तीनच रत्न आहेत… जल, अन्न आणि सुभाषित परंतु सामान्यव्यक्ती मात्र दगड़ान्नाच रत्न समजतो)   केवळ आपल्या आयुष्यातच नाहीं तर साहित्यात सुद्धा पाण्याला अनन्य साधारण महत्व आहें.. वरील सुभाषितात तर पाण्याला रत्नाची उपमा दिलेली आहें.. म्हणून हा विषय निवड़त […]

निड आणि स्पीड

आज विषयाला सुरु करण्याआधी खाली दिलेला तक्ता बघूया. Maggi 2-minute noodles Domino’s Pizza 30 minutes or free New Horlicks Dissolves in two seconds Amazon Prime Single day delivery option Meru Cabs Book a cab in less than 60 seconds Good Knight Xpress 9 minutes mein macchar gayab Fewikwick Chutki mein chipkaye Lifebuoy Liquid Handwash Protects […]

देणाऱ्या साऱ्या या  जवानांना

जिल्हा ..लातूर चा कृष्णकांत कुलकर्णी  शहीद झाला  तो दिवस  मी  कधीच विसरणार नाही.   अंतःकरण हेलावून  सोडणारा  हा दिवस!!!  आजही हे लिहीत असताना  डोळ्यात अश्रू आले आहेत.  कुठंलं अदृश्य नातं हे?  आणि प्रत्येक सुजाण  सुसंस्कृत  नागरीकांमधे हे असावंच आणि असतंच!!!   कृष्णकांत आमच्यातला, आमच्या गावातला, आमच्या मुलांचा मिञ. आमच्या मुलांच्या मिञांबरोबर च्या ग्रूप फोटोमधे  असलेला त्याचा फोटो  […]

मलाही सैनिक व्हावंसं वाटतं

कारगिलची बातमी ऐकताच असंच होतं काही कधी कधी स्वतःचं स्वतःलाच कळत नाही वीरपुत्रांचे पराक्रम ऐकून येतो मनात विचार की आपणही तेथे जावून द्यावा पाकिस्तानला मार   शाळेत समरगीते ऐकून अंगावर येतात शहारें एवढ्या थंडीत जवान कसे रहात असतील बिचारे एकदा तिथं जावून पहावसं वाटतं म्हणूनच मला सैनिक व्हावसं वाटतं…. टि.व्ही.वर द्रुश्य पहावत नाही क्षणभर मनात […]

पाच ‘WHY’

नमस्कार. माझ्या मागील लेखात आपण पहिले कि “5S” ( सीरी, सीतो, सीसो, सेकेत्सु आणि शित्सुके) ही कायझेन प्रणाली जर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सगळीकडे राबवली तर आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य अधिक सोपे आणि नीटनेटके राखू शकतो आणि आपली कार्यक्षमता देखील वाढवू शकतो. आज    “कायझेन” मधीलच अजून एक प्रणाली तुम्हाला सांगू इच्छितो ज्या प्रणालीमुळे जपानने […]

सर्वधर्म समदृष्टी होई सुजलाम सुफलाम सृष्टी

२१व शतक भारत आर्थिक महासत्तांच्या शर्यतीत पहिल्या पाच राष्ट्रात नक्कीच कुठेतरी आहे. या पहिल्या काही नंबरात येण्यात आपली अनेक वर्ष गेलीत तसेच येणारी अनेक वर्ष यात तग धरून राहणेही कठीण असणार आहे. अशातच संपूर्ण जगाला लागलेली वाळवी म्हणजे स्वधर्माचा अभिमान बाळगताना परधर्मियांचे चालू असलेले शरसंधान. वेगवेगळ्या अतिरेकी व धर्मवेड्या संघटना जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहेत तशा […]

COMMUNICATION RECHARGER

Communication is of prime importance with regard to development of one’s personality. Communication skills involve interaction with others, especially those with whom we want to improve our relationship, education as well as the workplace.    How can we develop our communication skills?  Learn the fundamentals of communication skills: Communication involves sending and receiving messages between […]