‘घर माझ्या स्वप्नांतलं!’

 

नमस्कार मंडळी,

आजचा विषय थोडा वेगळा आहे पण अत्यंत महत्वाचा आहे. आज मुंबई आणि मुंबई उपनगरात स्वतःचे घर बुक करणे आणि त्याचा ताबा मिळवणे अत्यंत सावधानतेचे झाले आहे. आज सभोवताली फसवणूक करणाऱ्या विकासकांच्या संख्येत वाढ होत आहे. म्हणूनच आपल्या कष्टाची कमाई काळजीपूर्वक गुंतवणे महत्वाचे आहे.

“तुमच्या मनातील प्रत्येक शंका जोपर्यंत दूर होत नाही आणि तुम्हाला घर घेण्याची प्रकिया स्वतःहून समजत नाही तोपर्यन्त घर बुक करू नका”.

प्राधान्याने काही गोष्टी घर घेण्याअगोदर पडताळून घ्या:

१. आपण बुक केलेले घर रेरा ऍक्ट मध्ये नोंद असावे.

२. महत्वाच्या कागदपत्रांची पहिल्यांदा पडताळणी करून घ्यावी.

३. विकासकाला भेटण्यापासून प्रत्यक्ष घराचा ताबा मिळेपर्यंतचा प्रवास लेखी/कागदोपत्री

असावा.

४. छुप्या खर्चांची नोंद असावी.

 

आज आपण पहिला मुद्दा ‘रेरा ऍक्ट’चा ग्राहकांना काय फायदा होऊ शकतो याची माहिती घेऊ.

‘रेरा’ हा रिअल इस्टेट संदर्भात पारदर्शकता येण्याकरिता निर्माण केलेला कायदा….जो विकासकाला बंधनकारक आणि ग्राहकाला फायदेशीर आहे.

१. कायद्यानुसार प्रत्येक विकासकाला रेजिस्ट्रेशन सक्तीचे आहे.

२. प्रोजेक्ट पूर्णत्वाचा कालावधी द्यावा लागतो.

३. प्रत्येक प्रोजेक्ट ची ७०% मिळकत सुरक्षित म्हणून ठेवावी लागते.

४. प्रोजेक्ट मध्ये बदल करायचा असल्यास २/३ ग्राहकांची मंजुरी लागते.

५. प्रोजेक्ट चा कालावधी वाढल्यास आणि ग्राहकाने तक्रार केल्यास भरलेली रक्कम

व्याजासहित परत केली जाते.

६. इमारती मध्ये पार्किंग नियमानुसार विकू शकत नाही.

ग्राहकांच्या हिताचे बरेचसे नियम ह्या ऍक्ट मध्ये नमूद केले आहेत, त्यापैकी काही खास मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. रेरा प्रमाणे प्रत्येक इतर मुद्द्यांवर आपण सविस्तरपणे माहिती पुढील लेखात पाहणार आहोत. धन्यवाद .

 

सुनील शांताराम कानाळ

(M.B.A Marketing, RERA Registered Real Estate Consultant)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *