अंकज्योतिष एक चमत्कार -भाग 2 | प्रारब्ध अंक 1-9 असेल तर काय ?
- दिर्घकालीन महत्वकांक्षा पूर्ण होते. ज्या गोष्टी हातात घ्याल त्यात यश मिळते. आर्थिक फायदा व बढती असा चढता आलेख असतो. परंतु अहंकाराने बोलणे टाळावे.
- भांडण किंवा वाद आवडत नाहीत. जाहिरात न करता शांतपणे काम करणे ही त्यांची पध्दत असते.बाहेरील जग व वातावरण या बद्दलही खूप संवेदनशील असतात. लहान मुले फार आवडतात. या लोकांना सामाजिक कार्याची आवड असते. हे पडद्या मागचे सुत्रधार असतात.
- जीवनात पैशांना महत्व दिले जाते. आर्थिक बाजू समाधान कारक असते. आपल्या व्यवसायाशी संबंधीत व्यक्तींमध्ये वावर जास्त असतो. यांना यशस्वी लोक मित्र म्हणून आवडतात.
- जीवनात पेच प्रसंग येतात त्यांना ते धाडसाने तोंड देतात. त्यामुळे कार्यक्षमता व आत्मविश्वास वाढतो. स्वतंत्रबाणा असतो. या लोकांच्या व्यक्तीमत्वात पॉझिटीव बदल होतात. या लोकांच्या विचारांना चांगली दिशा आणि मार्ग मीळतो मात्र या लोकांनी योजनेमध्ये लवचिकता ठेवावी.
- जीवनात सतत बदल होतात . अति बोलका स्वभाव नेहमी करार , कागदपत्रे , औद्योगिक व्यवहार यांच्याशी संबंध येतो. प्रवासामुळे आर्थिक फायदा होतो. अनेक गोष्टींची माहिती असते पण सखोलपणा कमी असतो. आपल्यापेक्षा लहान वयाच्या लोकांमध्ये वेळ घालवायला आवडतो.
- जीवनाचा पाया मैत्री ऐक्य भावनिक आपुलकी यांच्यावर आधारित असतो. भागीदारीत व्यवसाय केल्यास जास्त यश मिळते. सहकार्यांमध्ये लोकप्रिय असतात.
- या लोकांना आयुष्यात ध्येय असणे आवश्यक असते. ही मंडळी जास्त विचार करणारी असतात . यांनी पैशासाठी प्लॅनींग करावे.
- सतत कामातील व्यग्रता व चिकाटी याचा परिणाम दिसतो. असंख्य जबाबदारी आणि कष्ट करावे लागते. यांना उशीरा फळ मिळते परंतु कष्टाचे चीज होते. यांना वयस्कर लोकांपासून फायदा होतो.
- धाडसी स्वभाव असल्याने कोणताही परिस्थितीत न डगमगता काम करणे यांना जमते. महत्वकांक्षी योजनांचे पालन करणे व ते अंमलात आणणारे . यांच्यामध्ये शारीरीक व मानसिक दोन्ही ताकद असते. स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर दुसर्यांचे आजार बरे करू शकतात. परंतु तोंडावर ताबा ठेवल्यास प्रगती चांगली होते.
अंकशास्र विशारद सौ निताशा मोरे
फोन नंबर 9324680888
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!