लिहीते व्हा!

आपल्या आजूबाजूच्या  गोष्टींचे गहीरेपण जेव्हा माणसाला कळतं तेव्हा लिहावंसं वाटत. लिहीताना मनात घोळत असलेला विचार व भावना कागदावर उमटतात तेव्हा मेंदूतली जागा रिकामी झालेली जाणवते. जरा हलकं वाटतं. मनातील कल्पना लिखानाच्या रूपात शब्दामध्ये उतरतात.

स्वतःचे विचार लिहीण्यासाठी आपल्याला स्वतःच्या बुध्दीचा वापर करावा लागतो. अर्थात ते स्वतः लिहावं लागतं. आणि आपण पुन्हा चेक करतो आपण लिहीलेलं बरोबर आहे की नाही. त्यातूनच कदाचित चांगली कलाकृती निर्माण होते.

दुसऱ्यांनी लिहीलेलं काॅपी करण्यापेक्षा आपण स्वतः का लिहावं ? मी स्वतः स्टाॅपवाॅच हे पुस्तक लिहीण्यापूर्वी एअरपोर्टची अनियमित दिनचर्या अनुभवली होती. डे नाईट आॅफ बऱ्याचदा रात्रभर जागावं लागायचं. दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने झोपावं लागायचं. अशा पध्दतीने दिनक्रम सुरू असताना मी डाॅ अभय बंग यांना माझे प्रश्न विचारले. यावर काही टिप्स दयाल का? अशी त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं ‘‘बघ संजय माणूस ज्या परिस्थीतीत असतो त्याच परीस्थीतीत त्याने स्वतः प्रश्न काढले आणि त्यावर उत्तरं शोधली तर उत्तरं नक्कीच मिळतात आणि त्यातूनच जन्माला आलं ‘स्टाॅपवाॅच.’

लिखाण करणं ही देखील एक उपचार पध्दती( थेरेपी) आहे. संशोधकाच्या म्हणण्यानुसार आपलं लिखान व कविता मेंदूला रिफ्रेष करते. कविता किंवा लेख लिहीण्याचा एक आरोग्यदायी गुण म्हणजे आपल्या भावना लिखाणातून  निचरा झाल्यामुळे घुसमट होत नाही. त्यामुळे लिहील्यावर   हलकं वाटतं. त्यासाठी आपलं लिखान किंवा कविता दर्जेदारच हवी असा काही नियम नाही. आणि हो एकदा का लिहायला सुरूवात केली की, सरावाने आपलं लिखानही सुधारत जातं की. तेव्हा मग आपणच मागे का? चला तर लिहीते होऊ या… आपल्या कडील ज्ञानाची शिदोरी वाचक मित्रांसाठी खुली करूया…

कारण या ग्रुपमध्ये काही डॉक्टर, साहित्यक, वकिल, पोलीस,  एअर लाईन्स अधिकारी, तंत्रज्ञ, कॉर्पोरेट ट्रेनर इत्यादी आहेत, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा फायदा सगळ्यांनाच होऊ द्या. त्यामुळे आपल्याकडून लेख लिहिण्याची अपेक्षा आहे.

जे जे आपल्यासी ठावे, ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन

 

आपला संजय गोविलकर

पोलीस निरीक्षक, लेखक

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *