व्यवस्थापन रिचार्जर

नमस्कार.

 

दोन दिवसांपूर्वी आपण सर्वानी पाहिलत श्री.समीर पडवळ यांनी आपल्यामधील EXPIRE होत असलेल्या गोष्टींमध्ये बदल करावयास सुचवले. कारण चांगला बदल होणे हे मानवी जीवनाला आवश्यकच असतो. आज त्याच कडीला जोडून मला आपल्याला एका जापनीज शब्दाबद्दल सांगायला आवडेल तो शब्द म्हणजे ‘कायझेन’ . हा शब्द आपले जीवनमान सुधारण्यास आपणास मदत करेल यांत शंका नाही

‘काईझेन’ या शब्दाचा थोडक्यात अर्थ म्हणजे प्रत्येकाने स्वतःमध्ये सातत्याने चांगले बदल करत राहिलेल्या सततच्या सुधारणा. मग त्यांची गरज असो अथवा नसो. सुधारणा हि नेहमी चांगलीच.

 

मानवी जीवनात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्येचं तात्पुरतं सोल्युशन शोधण्यापेक्षा त्या समस्येच्या मूळ कारणाशी जाऊन त्या समस्येचे अस्तित्वच नाहीसे करणे ही खरी  ‘काईझेन’ सिस्टीमची खासियत. ‘काईझेन’ मुळे लोकांना त्यांच्या कुठल्याही क्षेत्रातील अकार्यक्षमतेचा अभाव नाहीसा करून, त्यांच्या जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यात आणि त्यांचे जीवनमान अधिक चांगल्या पद्धतीने बदलण्यास मदत होते आणि त्यांचा स्वयंविकास घडून येतो.

 

‘कायझेन’ हि सिस्टीम आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कधीही आणि कोठेही लागू करू शकतो आणि तेसुद्धा फक्त ‘शून्य’ रुपयांमध्ये!!! हो. हे अगदी खरं आहे कि ‘कायझेन’ हि सिस्टिम आपण आपल्या जीवनात चक्क फुकटमध्ये राबवू शकतो. ‘कायझेन’ आपण जिकडे जिकडे राबवू तिकडे तिकडे एखादा चमत्कार घडावा अशा प्रकारचा चांगला बदल घडलेला तुम्हाला काही दिवसातच जाणवेल. तर पाहूया या ‘कायझेन’ मधील पहिला मुख्य टॉपिक म्हणजे ‘५S’

 

१) SEIRI (सिरी) :- SEIRI म्हणजे आपल्या जीवनातील (घर, ऑफिस, समाज) खूप साऱ्या अनावश्यक गोष्टी ज्या आपल्याला पुन्हा कधीही लागणार नाहीयेत त्यांची लिस्ट करून त्या सर्वांची विल्हेवाट लावणे.  उदा: जुन्या-फाटक्या-तुटक्या-भंगार झालेल्या वस्तू, कधीतरी वापरत येतील म्हणून अडगळीत ठेवून दिलेल्या वस्तू, लहान होणारे कपडे-बूट, बिघडलेली उपकरणे, ई.

 

२) SEITON (सीतो) :- SEITON म्हणजे आपल्याला घरात किंवा ऑफिसमध्ये नेहमी लागणाऱ्या वस्तूंची/वस्तूंसाठी एखादी जागा निश्चित करून ठेवणे जेणेकरून त्या वस्तू आपल्याला जास्तीत जास्त ३०-४० सेकंदामध्ये मिळतील अश्या पद्धतीने त्यांची सिस्टिमॅटिक मांडणी करून ठेवणे. यामुळे आपला वेळ आणि कार्यक्षमता वाढू शकते.  

उदा: आपल्या कॉम्पुटर मधील हवे असलेले कामाचे फोल्डर किंवा फाइल्स, स्टॅम्पलर आणि पिना, घरातील स्वतःच्या पर्सनल वस्तू, ई.

 

३) SEISO (सीसो) :- SEISO म्हणजे आपण रोज घरात किंवा ऑफिसमध्ये वापरत असलेल्या गोष्टींची नेहमी स्वच्छता ठेवणे आणि त्यांच्यातील छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे  जेणेकरून त्या सर्व गोष्टींची योग्य ती निगा राखली जाईल आणि त्यांची लाइफटाईम नेहमीपेक्षा काही पटीने वाढेल आणि त्या वस्तू  ब्रेकडाउन होण्याचा प्रकार कमी घडेल.

उदा: घरातील फॅन/टीव्ही/मिक्सर, इलेक्ट्रिक उपकरणे, ऑफिसमधील स्वतःचे टेबल/कपाट, कॉम्पुटर किंवा मोबाइलमधील व्हायरस किंवा अनवॉन्टेड फाईल्स, व्हिडिओ, इमेजेस, ई

 

४) SEIKETSO (सेकेत्सु) :- SEIKETSO म्हणजे वर सांगितलेल्या तिन्हीही ‘S’ चे काटेकोरपणे प्लांनिंग करणे आणि त्यांची योग्य त्या त्या वेळेला अंमलबजावणी करून घेणे.

 

५) SHITSUKE (शित्सुके) :- SHITSUKE म्हणजे वरील सर्व गोष्टींमध्ये नेहमी नेहमी पहिल्यापेक्षा जास्त अधिक सुधारणा करतच जाणे आनि नेहमी नेहमी करतच राहणे याची कॉमिटमेन्ट स्वतःला देणे.

 

**************

‘मेड  इन चायना’ पेक्षा ते `मेड इन जपान’ असेल तर बिनधास्त द्या !’’ असे म्हणणार्‍या ग्राहकाचा विश्र्वास जपानी कंपन्यांनी संपादन केला असेल आणि सर्व जपानी नागरिकांनी  त्यांची स्वतःची, घराची, ऑफिसची, समाजाची आणि देशाची कार्यक्षमता वाढवली असेल तर ती केवळ फक्त या ‘काईझेन’ आणि ‘५S’ मुळेच.

अशाप्रकारे कायझेन आपण आपल्या घरात, ऑफिसमध्ये आणि सार्वजनिक आयुष्यात कोठेही राबवू शकतो. कायझेन मुळे आपण आपल्या ऑफिसमधून देत असलेल्या वस्तू किंवा सेवेचा दर्जा उंचावतो, खर्च कमी करता येतो, पर्यायाने स्पर्धेला तोंड देता येते व आपण आणि आपला कामधंदा टिकवू  शकतो. तसेच पर्सनल आयुष्यात आपले राहणीमान उंचावू शकतो, नातेसंबंध वाढवू आणि टिकवू शकतो.

 

तर मग आपणसुध्दा आजपासून हि कायझेन मधील ५S सिस्टिम आपल्या आयुष्यात अंमलात आणणार ना???

 

आपला नम्र,

अजय कुंभार

9967146370

www.swarajyatech.com

ajay@swarajyatech.com

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *