पाच ‘WHY’

नमस्कार.

माझ्या मागील लेखात आपण पहिले कि “5S” ( सीरी, सीतो, सीसो, सेकेत्सु आणि शित्सुके) ही कायझेन प्रणाली जर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सगळीकडे राबवली तर आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य अधिक सोपे आणि नीटनेटके राखू शकतो आणि आपली कार्यक्षमता देखील वाढवू शकतो. आज    “कायझेन” मधीलच अजून एक प्रणाली तुम्हाला सांगू इच्छितो ज्या प्रणालीमुळे जपानने त्यांच्या देशातील सर्वच व्यवसायांमध्ये आणि उद्योगधंद्यामध्ये कमालीची गुणवत्ता आणली आहे आणि जपानच्या प्रत्येक प्रॉडक्ट्सना जागतिक बाजारपेठेत मनाचे स्थान मिळवून दिले आहे. ती प्रणाली म्हणजे ” 5 WHY

 

आपल्या बहुतेक भारतीय लोकांची मानसिकता पहिली तर असं लक्षात येत कि; आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक ठिकाणी उध्दभवलेल्या कोणत्याही लहान-मोठ्या प्रॉब्लेम्सवर आपण तात्पुरत सोल्युशन काढून ती गोष्ट पुढे नेतो. तो प्रॉब्लेम नक्की कोणत्या गोष्टीमुळे झाला किंवा आपल्याकडून नक्की कोणती चूक झाली आणि किंवा कोणत्या गोष्टीची काळजी ना घेतल्यामुळे तो प्रॉब्लेम उध्दभवला याकडे आपण कानाडोळा करतो. किंवा तसाच प्रॉब्लेम परत येऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारीकडेही आपण दुर्लक्ष करतो. आपण त्या प्रॉब्लेम्सच्या ” *ROOT CAUSE* ” वर सोल्युशन काढत नाही त्यामुळे तेच तेच प्रॉब्लेम वारंवार येत राहतात आणि आपण त्यावर तात्पुरते सोल्युशन काढून प्रॉब्लेम पुढे ढकलतो आणि त्यातच खुश राहतो.

 

पण तेच जपानमध्ये नेमकं याच्या उलट केलं  जातं. तिकडे जर असा कोणताही प्रॉब्लेम पर्सनल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उध्दभवला तर त्या प्रोब्लेमच्या ” *ROOT CAUSE* ” पर्यंत पोहचण्यासाठी त्या प्रॉब्लेम्सवर ५ वेळा “का?” हा प्रश्न विचारला जातो. कारण ” *5 WHY* ” या प्रणालीनुसार कोणत्याही प्रॉब्लेम्सच मूळ हे तो प्रॉब्लेम काय केल्यामुळे घडला किंवा काय ना केल्यामुळे घडला या प्रश्नाच्या ५ उत्तरांमध्ये दडलेलं असतं. हे चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया.

 

***********

 

घटना क्र. ) कंपनीमधील इंजिनाचा नव्याने बसिवलेला शाफ्ट तुटल्यामुळे कंपनीमधून तयार होणाऱ्या वस्तूचे उत्पादन थांबले

आता वरील घटना घडल्यामुळे सोल्युशन म्हणून डायरेक्ट नवीन शाफ्ट लावून पुढे जाणे हे अतिशय अयोग्य आहे. त्याऐवजी नवीन लावलेला शाफ्ट अचानक का तुटला यामागचं खरं कारण जाणून घेण्यासाठी त्या घटनेला  “5 WHY” विचारावे लागतील जेणेकरून त्यामागचं खरं कारण समजेल आणि पुढे होऊ शकणाऱ्या सेम प्रोब्लेमला आळा बसेल. तर पाहूया हे “5 WHY” नक्की कसं काम करतं.

 

पहिला का? – इंजिनाचा शाफ्ट हा नेहमीपेक्षा कमी प्रतीचा किंवा गुणवत्तेचा होता का?

उत्तर – नाही. नेहमीच्याच व्हेंडरकडून घेतलेला सेम क्वालिटीचाच शाफ्ट होता.

 

आता पहिल्या प्रश्नाचे उत्तर योग्य असूनही प्रॉब्लेम आला आहे म्हणजेच साहजिकच दुसरा काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यासाठी दुसरा “का?” विचारने गरजेचे आहे जेणेकरून त्या शाफ्ट तुटण्यामागचे दुसरे कारण भेटेल.

 

दुसरा का? – इंजिन प्रमाणापेक्षा जास्त वेळ सलग चालू होत का?

उत्तर – नाही. प्रत्येक ३ तासानंतर इंजिन १० मिनिटासाठी बंद ठेवले होते थंड करण्यासाठी.

 

तिसरा का? – इंजिनमध्ये प्रत्येक शिफ्ट सुरु होताना शाफ्टला ऑइलिंग किंवा ग्रीसिंग केले होते का?

उत्तर – हो

 

चौथा का? – इंजिनाचा महिन्यातून एकदा केला जाणारा प्रेव्हेंटीव्ह मेन्टेनन्स केला होता का?

उत्तर – नाही. ठरवलेल्या दिवशी टेकनीशियन सुट्टीवर असल्या कारणाने या महिन्यातला प्रेव्हेंटीव्ह मेन्टेनन्स करायचा राहून गेला होता.

 

***********

 

वरील उदाहरणावरून हे लक्षात येतं की, नव्याने बसवलेल्या शाफ्ट तुटण्यामागचे मूळ हे त्या इंजिनाचा योग्य वेळी प्रेव्हेंटीव्ह मेन्टेनन्स न करणे हा होता. आणि ते आपल्याला चौथ्या ” WHY” मध्ये भेटले.

 

त्यामुळे प्रत्येक प्रोब्लेमवर तात्पुरतं सोल्युशन न काढता त्या प्रोब्लेमच्या मुळापर्यंत जायला हवे आणि तो प्रॉब्लेम मुळापासूनच उपटून काढायला हवा जेणेकरून सेम प्रॉब्लेम परत परत येणार नाही आणि आपला वेळ, पैसा आणि मेहनत वाया जाणार नाही.

 

5 WHY” प्रणाली फक्त व्यावसायिक ठिकाणीच वापरू शकतो किंवा याचा उपयोग फक्त व्यवसायमध्येच होतो असे काही नाहीये. आपण हीच ” 5 WHY” प्रणाली आपण आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या इतर सर्व प्रोब्लेम्सवर देखील वापरू शकता आणि अचानक किंवा नेहमी नेहमी उद्भवणाऱ्या प्रोब्लेम्सच्या मुळापर्यंत जाऊन ते प्रॉब्लेम्स परत येणार नाही याची खबरदारी घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्याची गुणवत्ता अधिक प्रमाणात सुधारू शकतो.

 

तर मग आजपासून प्रत्येक प्रॉब्लेमला विचारणार ना 5 वेळा WHY ???

 

 

अजय कुंभार

(स्वराज्य इन्फोटेक / जीवनरंग)

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *