आर्थिक नियोजनाचे तीन थर

माझ्या वाचनात एक मुद्दा आला होता तो तुमच्याशी शेअर करावा म्हणून…

एखादी ३ मजली इमारत पाहिली आहे का ? अर्थातच हो!

समजा तुम्ही त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एखादे काम चालू केले तर बहुद्या पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर त्याचा परिणाम तितकासा जाणवत नाही.

परंतु तुम्ही पहिला मजला तोडला तर इमारत उध्वस्त होईल. तुम्ही म्हणाल हे होणारच! त्यात वेगळे असे काय? एकमेकांवर अवलंबून असतील तर परिणाम होणारच!

मित्रांनो आपले आर्थिक जीवन पण ह्या ३ मजली इमारती सारखेच आहे. एकमेकांशी ३ मजले अंतर्गत रित्या जोडले गेले आहेत. महत्वाचे म्हणजे आपल्या प्रत्येकाला ह्या थरांबद्दल माहिती असायलाच हवी. अन्यथा इमारत कोसळलीच समजा. तर हे आहेत ते तीन थर.

१. SECURITY (सुरक्षा)
काही अनपेक्षित घडले तर माझ्या कुटुंबाचे काय? तुम्ही सर्वांनी याचा विचार केलाच असेल. म्हणूनच पहिला थर Life Insurance, Home Loan Insurance, Health Insurance, Critical Illness याची तुम्ही तरतूद केलेली असेलच.

 

२. GROWTH (वाढ)
तुमच्या पैशाची वाढ होणे तुम्हाला माहीतच असेल. वाढ ही आकडेवारीमध्ये नसावी तर भविष्यात खरेदीची ताकद त्या पैशात असावी. नाहीतर काहिजनांकडे एक लाख रुपयांची Insurance Policy असते ज्यामध्ये १० वर्षांनंतर दोन लाख मिळणार. पण १० वर्षांनंतर महागाई आणि कर यांच्या वाढीमध्ये दोन लाख रुपयांत आत्ताची एक लाख रुपयांची पण खरेदी करू शकणार नाही. मग काय फायदा अशा वाढीचा!

 

३. PRESERVATION (साठवण)
Retirement ची वेळ, उतरते वय अशावेळी तुमची साठवण तुमच्या उपयोगी येणार. वाढीपेक्षा साठवलेला पैसा ह्या काळात जास्त महत्वाचा असतो.

 

इमारतीचे थर समजले पण खरी जादू पुढे आहे जेव्हा तुम्हाला ह्या तिघांचे अंतर्गत नाते समजेल.

उदाहरण क्र. १
समजा तुम्ही छानपैकी गुंतवणूक करत आहात, बऱ्यापैकी Insurance Policy, Stock, Mutual Fund आहेत आणि त्यातच काही अनपेक्षित घडले तर? एखादा अपघात झाला. तुमचे सर्व लक्ष GROWTH वरती होते, SECURITY चे काय? Health Insurance नाही, त्यामुळे हॉस्पिटची बील फेडण्यासाठी थोड्याफार Investment होत्या त्या निघून गेल्या. चुकून अपघातात आपण कायमचे निघून गेलात तर GROWTH चे काय? कुटुंबाला महिन्याचे खर्चही भागवता येणार नाही.
“यामध्ये तुम्ही इमारतीच्या दुसऱ्या थरावर लक्ष केंद्रित केले परंतु पहिला थर मजबूत नव्हता”

 

उदाहरण क्र. २
समजा SECURITY तुमची छान आहे. Term Insurance, Health Insurance छानपैकी आहेत पण मग पारंपारिक गुंतवणूक आहेत ज्यामध्ये ६% पेक्षा जास्त परतावा मिळत नाही. अशा वेळी Retirement होते, मग तुम्ही साठवलेली गुंतवणूक त्या काळात पुरेशी नसते.
उदा. तुमच्याकडे त्यावेळी १०० युनिट असतील आणि दर महिन्याला १० युनिट लागणार असतील आणि तुम्हाला गुंतवणुकीवर ५% परतावा मिळणार असेल तर महागाई वाढेल त्याप्रमाणे युनिट जास्त लागणार आणि आपल्याकडे पुरेसे युनिट नाहीत. आता विचार करा आपल्याकडे ३०० ते ४०० युनिट असते तर चित्र उलटे होऊ शकले असते.
याचा अर्थ PRESERVATION (साठवण) शक्य होते जेव्हा GROWTH (वाढ) असते.

दोन्ही उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात येते. SECURITY, GROWTH आणि PRESERVATION यामध्ये इमारतीच्या SECURITY या मजल्याच्या विचार केला तर GROWTH वरती काही फरक पडत नाही आणि GROWTH व्यवस्थित असेल तर PRESERVATION तुमच्या अपेक्षे पेक्षा जास्त असेल.

म्हणूनच मित्रानो, आपल्या आर्थिक जीवनाच्या इमारतीमधील प्रत्येक मजल्याचा विचार करा आणि आपले जीवन आर्थिक दृष्ट्या समाधानी बनवा!

 

आपला मित्र

सुनिल कानाळ (आर्थिक सल्लागार)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *