राईट टर्न

लाईफ रिचार्ज

राईट टर्न, योग्य दिशेने उचललेले पाऊल राईट टर्न, उद्याच्या उद्योजकांना यशाचा कानमंत्र राईट टर्न, श्री. नितीन पोतदार यांची मुलाखत “प्रगतीचा एक्स्प्रेस वे” लेखक नितीन पोतदार या पुस्तकाच्या तिस-या व “स्टोपवॉच” लेखक संजय गोविलकर या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन प्रमुख पाहुणे : श्री. विवेक फणसळकर (सह पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग) श्री. विश्वास नांगरे पाटील (अतिरिक्त पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग)

रंगभूमी आणि साहित्य

लाईफ रिचार्ज

जीवनरंग आयोजित जीवनप्रवाह “रंगभूमी आणि साहित्य”, रंगकर्मी मा. श्री. अशोक मुळ्ये आणि अमेय प्रकाशनाचे सर्वेसर्वा श्री. उल्हास लाटकर यांची मुलखात.

संवाद माझा – तुझा

मुंबई पोलिस आणि जीवनरंग

मुंबई पोलिस आणि जीवनरंग अंतर्गत राबविण्यात आलेला अप्रतिम उपक्रम म्हणजे “संवाद तुझा – माझा”. हल्ली घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याने मुंबई पोलीस आणि जीवनरंग संयोगाने निर्माण करण्यात आलेला हा उपक्रम नात्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची उम्मीद देणार यात शंकाच नाही. माननीय आर. आर. पाटील यांनी श्री. विनोद मेस्त्री आणि जीवनरंग टीम चे कौतुक केले या विषयाला घेऊन काहीतरी नवीन घडवल्या बाबत.

समस्या ते संधी पुस्तक प्रकाशन सोहळा

लाईफ रिचार्ज

शून्यातून विश्वनिर्मिती खरच शक्य आहे हि भावना मनात ठेवून स्वतःचे वेगळं उद्योगविश्व निर्माण करणारे अॅग्नेलोराजेश अथायडे यांच्या समस्या ते संधी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा.

शुक्रवार, २६ डिसेंबर २०१४ सायंकाळी ६ वाजता
वेलींकर इन्स्टिट्यूट ऑडिटोरिअम, माटुंगा (पूर्व)

शिवाजी महाराजांची नीती आणि उद्योजकता

लाईफ रिचार्ज

अॅग्नेलोराजेश अथायडे आणि विनोद अनंत मेस्त्री यांची मुलाखत. शिवाजी महाराजांची नीती आणि उद्योजकता यांची सांगड घालणारा अद्वितीय उप्रक्रम. श्री. प्रसाद लाड, श्री. जगन्नाथ हेगडे, श्री. अनंत भालेकर, श्री. संदीप घनदाट, श्री. पवार, श्री. राजेश अथायडे या मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

२४ फेब्रुवारी २०१४ सकाळी १० वाजता
रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी

कोर्पोरेट शिवाजी राजे : उद्योग यशाची प्रभावी सुत्र

लाईफ रिचार्ज

महाराजांच्या उद्योजकतेच्या तत्वांचा वापर आपल्या उद्योगात करूया आणि आपापल्या उद्योग क्षेत्राचे आपण “शिवाजी” होऊया.

उद्योगात योग्य तो परिणाम कसा साधाल?
५०% लीडर्स का अपयशी होतात? आपण त्यांच्यापैकी एक होणं कसे टाळाल?
उच्च कार्यक्षमता असलेली टीम कशी तयार कराल?
उद्योगातील धोरणे काय आहेत ? आणि ती यशस्वीरीत्या कशी राबवलराबवाल ?
Calculated risk म्हणजे काय? त्याचा उद्योगात वापर.
उद्योग यशाची आठ प्रभावी सुत्र कोणती?
जीवघेण्या स्पर्धेत अग्रेसर कसे राहाल?
दीर्घकाळ टिकणारे उद्योगविश्व कसे उभे कराल?

या सर्व प्रश्नांची उत्तरे शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आधुनिक पद्धतीने उद्योजकांसमोर मांडणारा एक अद्वितीय सेमिनार…

मराठा थ्री हंड्रेड…दी लाईफ लाईन

लाईफ रिचार्ज

‘मराठा थ्री हंड्रेड’ या व्याख्यानात ३०० मावळ्यांसह बाजीप्रभू यांचा ५००० शत्रू सैन्याशी घोडखिंडीतला युद्ध थरार आणि त्याच अनुभवातून उच्च कार्यक्षमता काय असते आणि तिचा योग्य वापर करून आपण विलक्षण यश कसं प्राप्त करू शकतो यावर असा जबरदस्त प्रोग्राम.

२९ नोव्हेंबर २०१४ सकाळी १० वाजता
नेहरू तारांगण ऑडिटोरिअम

मुलाखतकाराची मुलाखत

लाईफ रिचार्ज

मुलाखतकाराची मुलाखत या कार्यक्रमामध्ये सौ. उत्तरा मोने आणि सौ. ज्योती आंबेकर या अप्रतिम मुलाखत करांची मुलाखत घेणायची संधी जीवनरंगला मिळाली.