विनोद अनंत मेस्त्री

आय लीड ट्रेनिंग्स आणि श्री कॉमर्स अकॅडमीचे संचालक. मला शिवाजी व्हायचंय, समस्या ते संधी, आय लीड मंत्र या पुस्तकांचे लेखक, प्रशिक्षक, प्रेरणादायी वक्ते, समुपदेशक.

श्री. विनोद मेस्त्री हे एक प्रसिद्ध उद्योजक, प्रेरणादायी वक्ता, ​सॉफ्ट-स्किल ​ट्रेनर, पती-पत्नी नातेसंबंध सल्लागार, अभिनेता, लेखक आणि कवी असून गेले ११ वर्षे ते विविध विषयांवर तरूणांना, विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करत आहेत. आजपर्यंत त्यांनी ८०००० पेक्षा जास्त लोकांना वेगवेगळ्या विषया अंतर्गत ८५० पेक्षा जास्त सेमिनार आणि कार्यशाळेमधून मार्गदर्शन दिले आहे.

आपल्या सर्वांचे दैवत असलेले श्री. छत्रपती शिवाजी महाराजांवर विनोद मेस्त्री यांनी गेले ​१०​ वर्षापेक्षा जास्त काळ वाचन आणि लिखाण करून त्यांच्याबद्दल विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. प्रत्येक गोष्टींत महान असलेल्या श्री.शिवाजी महाराजांच्या जीवनातील योग्य त्या तत्वांचा वापर करून प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि आर्थिक जीवनाचा “शिवाजी” होऊ शकतो आणि त्याचे आयुष्य परिपूर्ण करू शकतो यासाठी विनोद मेस्त्री यांनी “मला शिवाजी व्हायचंय” आणि प्रत्येक व्यक्तीमधील कार्यक्षमता वाढवण्यासाठी “मराठा ३००” हे सेमिनार तयार करून शिवाजी महाराजांना एका वेगळ्या अनुषंगाने लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी घेतली आहे. आतापर्यंत १​५० पेक्षा जास्त ठिकाणी त्यांच्या या वरील विषयांवर व्याख्याने झाली आहेत. काही कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट कंपन्यांसाठी त्यांनी “कॉर्पोरेट शिवाजीराजे” हा सेमिनार घेऊन त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत केलेली आहे. या विषयांवर त्यांचे पुस्तक देखील प्रकाशित झालेले आहे आणि त्यास मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे. प्रसिद्ध मराठी उद्योजक श्री. अग्नेलोराजेश अथायडे (सेंट अँजेलोज कॉम्पुटर इन्स्टिटयूटचे संस्थापक) यांच्या “समस्या ते संधी” आत्मचरित्राचे शब्दांकन देखील यांनी केलेले आहे.

श्री. विनोद मेस्त्री यांची “श्री कॉमर्स अकॅडेमी” हि एक चेंबूर, मुंबईमधील नावाजलेली कोचिंग इन्स्टिटयूट असून गेल्या १२ वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी “आय लीड माय लाईफ” आणि “शुभारंभ – एका नव्या जीवनाचा” या उपक्रमा अंतर्गत मदत करत आहेत.

महाराष्ट्र पोलिसी नोकरीमध्ये असलेल्या पती-पत्नीमधील वाढते तणाव आणि घटस्फोट यांवर देखील त्यांनी “संवाद तुझा माझा” आणि “पालक-बालक सुंसंवाद” हे उपक्रम चालू करून महाराष्ट्र पोलिसांची कुटुंब व्यवस्था भक्कम करण्यास मदत केलेली आहे त्यास महाराष्ट्राचे दिवंगत उप-मुख्यमंत्री आणि गृहमंत्री  श्री. आर. आर. पाटील यांचे विशेष योगदान लाभलं होतं. तसेच पोलिसांमध्ये नव्याने भरती होणाऱ्या लोकांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी सॉफ्ट-स्किल कौशल्यावर आधारित महाराष्ट्रातील १० पोलीस ट्रेनिंग सेंटर्स येथे ३-३ दिवसांचे ट्रेनिंग सेशन्स घेऊन पोलिसांना बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक लाभ मिळवून देण्यास मदत केलेली आहे. आजपर्यंत त्यांनी जवळपास १२००० पेक्षा जास्त पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना वरील विषयांवर मार्गदर्शन केलेले आहे.

​एक सक्षम पिढी घडवण्याची ताकद शिक्षकांमध्ये असते आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये शिक्षकांमध्ये विकसित करण्यासाठी ​”सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षक” या कार्यशाळेतून ते ६५०० पेक्षा जास्त शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम करत आलेले आहेत.

श्री. विनोद मेस्त्री यांनी आतापर्यंत प्रसिद्ध सूत्रसंचालक उत्तरा मोने, समाजसेवक डॉ. अभय बंग आणि सिंधुताई सकपाळ, पोलीस महानिरीक्षक श्री. ​विश्वास ​नागरे पाटील, मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी, प्रसिद्ध सरकारी वकील श्री. उज्वल निकम आणि कॉर्पोरेट वकील श्री. नितीन पोतदार, ऍडगुरु भरत दाभोलकर, संगीतकार सलील कुलकर्णी, पोलीस डीजी श्री. अरविंद इनामदार, श्री. राजेश अथायडे, श्री. संजय गोविलकर (आतंकवादी कसाबला जिवंत पकडणारे), ई लोकांच्या मुलाखती आणि त्यांच्या कार्यक्रमांचे सूत्र संचालन आणि व्यवस्थापन उत्कृष्टरित्या केलेले आहे.

ब्लॉग