शवदाहिनी

शहरात स्मशानांची व्यवस्था चांगली आहे. परंतू ग्रामीण भागात आजही स्मशानांची अवस्था दयनीय आहे. गावात आजही प्रेत जमिनीवर जाळली जातात. याला किमान १२ ते १५मण लाकडू व किमान ५ लिटर रॉकेल लागते. त्याचे तोटे म्हणजे अंतःविधीचा खर्च वाढतो. तसेच पर्यावरणाचा समतोलही ढासळतो. प्रेतं जाळलेल्या जागी भटकी कुत्री व गुरंढोरं वावरल्यामुळे त्या जागेची हेळसांड होते. आणि शेवटी धावपळीत आणि दगदगीत जीवन जगल्यानंतर माणसाचा अंत तरी शांततेत व्हावा या हेतूने जीवनरंगने अशा गावात शवदाहीनी पूरवायची मोहीम हाती घेतली. १) यामुळे लाकडू  फक्त ५ ते ७ मण लागेल. २) जागेची हेळसांड होणार नाही. ३) पर्यावरणाचा तोल सांभाळायला मदत होईल. ४) अंत्यविधिचा खर्च कमी होईल. पहिली शवदाहीनी कोल्हापूर जिल्हयातील नांगनूर या गावी बसविण्यात आली आणि दुसरी शवदाहीनी सातारा जिल्हयातील दहिवडे या गावी बसवण्यात आली आहे.