A platform to provide guidance of Successful people to the general public to help them prosper in all areas of life.

यशस्वी जीवन जगायचं असेल तर ते यशस्वी लोकांच्या अनुभवातून अधिक लवकर जमू शकतं याच प्रांजळ हेतूने जीवनप्रवाह या कार्यक्रमातून यशस्वी व्यक्तींच मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जीवनरंग करत आहे. परिणामी आजपर्यंत शहीद हेमंत करकरे, विश्वास नांगरे-पाटील, डॉ. अभय बंग, सिंधूताई सपकाळ, भरत दाभोळकर, नितीन पोतदार, अग्नेलोराजेश अथायडे, डॉ. सुधीर निरगुडकर, श्रीमती प्रतिभा हवालदार, सरकारी वकील उज्ज्वल निकम, पद्मश्री. पद्मजा फेणाणी-जोगळेकर, अशोक मुळेकाका, डॉ. श्रीराम नेणे, निवृत्त पोलिस महासंचालक अरविंद इनामदार, डॉ. जितेंद्र दीक्षित इत्यादी मान्यवरांनी ‘जीवनरंग’ संस्थेत मार्गदर्षन करून उपकृत केलेले आहे. अशा व्यक्तींचा आपणास परिचय करून देणे व ते करीत असलेल्या कार्यास संस्थेच्या माध्यमातून हातभार लावणे, हा जीवनरंगचा चा अजून एक मानस आहे.