फ्लश – फेकून द्या कचरा मनातला

लेखक: संजय गोविलकर

जसजसं तुम्ही हे पुस्तक वाचायला सुरुवात कराल, तसतसं या पुस्तकातल्या गोष्टींमधली पात्रं तुम्हाला आपल्या आसपासच वावरताना दिसतील. काही आपल्या घरात सापडतील, तर काही आपल्या स्वतःमध्येही दडलेली असतील. या सर्व कथा वाचता वाचता आत्मपरीक्षण करताना तुम्हाला काहीतरी गवसेल. ज्यावेळी तुम्ही स्वतः साठवलेला कचरा मग तो कोणत्याही प्रकारचा असो, तो जेव्हा डस्टबीनमध्ये टाकाल, तेव्हाच तुम्हाला रितेपणाचा, मोकळेपणाचा, एक प्रकारच्या हलकेपणाचा अनुभव होईल. रिकामी झालेली जागा मग ती घरातली असो वा मनातली, ती पाहून प्रसन्न वाटेल आणि इतका मोकळा अवकाश मिळाल्यावर आनंदाला काय तोटा? चला तर आपल्या डस्टफ्री जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • प्रकाशन : जीवनरंग प्रकाशन
  • प्रथम आवृत्ती : ३० डिसेंबर २००७
  • सहावी आवृत्ती : ३०डिसेंबर २०१२
  • पाने : २५०
  • भाषा : मराठी
  • ISBN-10 : 8191091682
  • ISBN-13 : 978-8191091687

मूल्य : रु. २५०/-