शुभारंभ-नव्या प्रभावी जीवनाचा

क्षणस्थ होऊन जगण्याचा!

आय लीड च्या या १०० मंत्रांनी तुम्हाला प्रेरणा निश्चितच दिली असेल. परंतु मंडळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक भूतकाळ असतो. काही लोक भूतकाळातील भल्या-बुऱ्या आठवणींमध्ये गुरफटलेले असतात. त्यांचीच ढाल करून वर्तमानकाळातील लढयांपासून स्वतःचा बचाव करतात. काहीजण खरंच या लढाया लढतात तर काहीजण आपल्या तलवारी म्यान करतात. वर्तमानाच्या खरी ताकद न समजल्याने रडत-कुढत आयुष्य काढतात.

आपल्या भूतकाळाच्या काळ्या डायरीची ही योजना असते. आपल्या प्रत्येकाच्या मनात ती दडलेली असते. यातील प्रत्येक पान विविध नातेसंबंधांतील तणावाचे असते अथवा भूतकाळातील कटू आठवणींचे असते. वर्षेगणिक ही पाने वाढतंच जातात. जळते निखारे हाती घेऊन हात कधी भाजले कळतंच नाही आणि आपण मात्र समाज, परिस्थिती, वाईट वेळ या मागे स्वतःला खचवून घेतो. झगडत असतो स्वतःशीच आणि सतत हरत असतो. तेव्हा खरंच जगावं की मरावं? हा एकंच प्रश्न असतो.

या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या आजवर होत असतो. राग, चिंता, भय, ईर्षा, तिरस्कार, अपराधाची भावना, अस्वस्थपणा अशा नकारात्मक भावनांनी आपण ग्रासून जातो.

यावरील उपाय म्हणजे ‘क्षणस्थ’ होणे. आताच्या क्षणात जगणे. आपला नकारात्मक भूतकाळ नष्ट करून, वर्तमानात जगायला शिकवणारी अभूतपूर्व कार्यशाळा म्हणजे ‘शुभारंभ’!

आपल्या मनात आपल्याही नकळत साचलेल्या कचऱ्याचा निचरा करणारी,
आयुष्य सर्वांग सुंदर जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन देणारी,
तुमच्या आतून प्रेरणा निर्माण करायला शिकवणारी,
आपल्या जीवनाचा तारू यशस्वी रीतीने पार नेण्यासाठी सखोल अभ्यासांती तयार केलेली कार्यशाळा म्हणजे ‘शुभारंभ’

या दोन दिवसीय कार्यशाळेविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर पुढील क्रमांकावर संपर्क साधा:

सौ. सुनायना सावंत – ९६६४३७५५०१ | श्री. अतिश कुलकर्णी – ८१०८१०८४९२