भारत जोडो

भारतीय हीच आमची जात मानवता हाच आमचा धर्म..!

स्वातंन्न्याच्या साठ वर्षांनंतरही आपण जातीभेदाच्या भोवऱ्यात अडकलेले आहोत. आजपर्यंत झालेले जातीभेद धर्मभेद यांचा विचार करता आजपर्यंत अमर्याद मनुष्यहानी व वित्तहानी झाल्याचे आपल्याला आढळेल. आपल्यावर होणारे आतंकवादी हल्ले दहषतवादी कारवाया हे देखील याचाच परिणाम आहेत. 26 नोव्हेंबरच्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर आजतरी गरज निर्माण झालीय ती आपण एक होण्याची जाती, धर्म विसरून भारतीय म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्याची. तर सर्व भारतीय आपले जातीय, प्रांतीय वैर विसरून एकत्र आले तर जगातील कोणत्याही दृष्टप्रवृत्तीची भारताकडे नजर वर करून पाहण्याची हिम्मत होणार नाही. याचसाठी सर्व भारतीय एक व्हावेत हा मानस हाती घेऊन जीवनरंगने ‘भारत जोडो’ ही चळवळ नव्याने सुरू केली आहे त्यासाठी विविध कार्यक्रम राबवून याबाबतीत जागृकता आणणं हा जीवनरंगचा दुसरा हेतू आहे.