आम्ही भारतीय!

आज देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे उलटली. तरीही जाती, धर्म, पंथ, यावरून दंगे व वाद होतच आहेत. आपली नेमकी हीच दुखरी नस तेंव्हा इंग्रजांना लक्षात आली होती. त्यांना कळलं हे लोक धर्मावरून कधीच एकत्र होणार नाहीत. त्यामुळेच त्यांनी भारतातील निरनिराळ्या धर्मांमध्ये भांडणे लावून दिली फोडा आणि राज्य करा हेच तर त्यांचं मुख्य धोरण होते. आणि म्हणूनच तर ते आपल्या देशावर 150 वर्षे राज्य करू शकले दुःखाची गोष्ट ही की आपण आज ही आप आपसात धर्मासाठी हाणामारी करून एकमेकांचे रक्त सांडतोय आणि याचा फायदा देशाच्या शत्रूंना होतोय. निरनिराळ्या जातीच्या मुखवट्या मागे आपण हे विसरलोच आहोत की आपण भारतीय आहोत।

जन्म घेतना नवजात बालकाला ही माहित नसतं की तो कुठे जन्माला येतोय पण जसं त्याचा जन्म होतो त्याच्या वर त्या त्या कंपनीचं प्रोडक्ट स्टिकर लावला जातो आणि मग त्याप्रमाणे त्याला नाव दिलं जातं. त्याचं रॅपर ही तशाच पद्धतीने पॅक होतं. आणि जन्मभरसाठी तो त्या कंपनीचा ब्रँड अंबिस्टर बनतो। यात धर्म जात व पोटजात यांचा पगडा माणसावर वज्रलेपसारखा चिकटतो तो अगदी जन्मापासून मृत्यू पर्यंत. त्यापेक्षा भयंकर म्हणजे सख्खा बाप मुलीने जाती बाहेर लग्न केले म्हणून तिचा सुरीने गळा चिरतो तेंव्हा जातीपातीची मुळं किती खोलवर रुजली आहेत याचा प्रत्यय येतो. जातपात, आरक्षण वरून होणारे वाद मोर्चे आपण पाहतोच आहोत.

आपल्या बाबतीत असे होऊ नये म्हणून मी व आपल्या जीवनरंग च्या सहकाऱ्यांनी आपापल्या मुलांची जात भारतीय म्हणून नोंदविली आहे। भारतीय हीच आमची जात आणि मानवता हाच आमचा धर्म हेच जीवनरंग चे मुख्य उद्दिष्ट आहे। हा विचार घेऊन जर आपण एकत्र आलो तर काहीतरी चांगले घडेल असं मला वाटतं.

घराबाहेर भारतीय हीच आमची जात आणि मानवता हाच आमचा धर्म असं जर का आपण करू शकलो. हा प्रयत्न आम्हीही करत आहोत कारण यामुळे येणाऱ्या पिढीला तरी ही जातीपतीची झळ बसणार नाही. आज भारताचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असेल काही लोकांनी दहशती पोटी दुकानं बंद ठेवली तर काहींनी उस्फुर्त पणे बंद ठेवली यातून आपण खरंच काही कमावलं का? असे बरेचसे प्रश्न निर्माण झाले.

आपल्या ग्रुपमध्ये निरनिराळ्या प्रकारचे तज्ज्ञ आहेत। तर आपण सर्व मिळून यावर काही तरी नक्कीच करू शकतो। आपणाकडून याबाबतीत कायदेशीर बाबी काय आहेत याबाबत माहिती हवी आहे. या बाबतीत आपल्याला काही करता येईल का? यावर सर्वांनी विचार विनिमय करूया.

धन्यवाद

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *