सुबोध मेस्त्री

संचालक – स्वराज्य इन्फोटेक आणि विश्वस्त – जीवनरंग ट्रस्ट. www.shodh.gov.in या वेबसाईटचा जनक, ४०० हुन अधिक समाधानी ग्राहकवर्ग

सुबोध मेस्त्री हे एक एम. सी. ए. पदवीधर असून त्यांना माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात ११ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर ARC Compusoft, Intraweb या कंपनीत काम केल्यावर त्यांनी स्वतःची “स्वराज्य इन्फोटेक” या नावाची सॉफ्टवेअर, वेब पोर्टल, मोबाईल ऐप बनवणारी कंपनी 2009 साली स्थापन केली आणि आजपर्यंत 550 पेक्षा जास्त कंपन्यांना ते सेवा पुरवीत आहेत.

काही उल्लेखनीय कामगिरी

ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल अँड ओंतप्रनर्स ग्रुप (OMPEG), लंडन यांच्यातर्फे राबवल्या गेलेल्या “लंडन मराठी संमेलन २०१७” मध्ये बिजनेस अवॉर्ड साठी टॉप ६ महाराष्ट्रीयन मराठी उद्योजकांमध्ये निवड.

महाराष्ट्र पोलीस दलातर्फे महाराष्ट्रभर व जिल्हा परिषद शिक्षक (ठाणे जिल्हा) इथे टेक्नॉलॉजी ट्रेनर म्हणून कार्यरत

www.shodh.gov.in (शोध) या महाराष्ट्र शासनातर्फे बनवण्यात आलेल्या हरवलेल्या आणि मृत व्यक्तींना शोधण्यास मदत करणारे पोर्टलचे जनक. या कामासाठी डेप्युटी जनरल पोलीस श्री. संजय बर्वे यांच्याकडून सत्कार तसेच हिंदुस्थान टाइम्स, नवभारत टाइम्स, DNA, IBN लोकमत, झी न्यूज, ई विविध वृत्तपत्र आणि टिव्ही न्यूजमध्ये या पोर्टलची विशेष दखल.

दूरदर्शन चॅनेलवर “तंत्रज्ञान माध्यमतज्ञ” म्हणून विशेष लाईव्ह मुलाखत.

महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, मुंबई येथे “ट्रेन द ट्रेनर” या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पोलीस ट्रेनिंग सेंटर मधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. व्यंकटेशन यांच्याहस्ते सत्कार आणि स्मृतिचिन्ह.

महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये घडणाऱ्या मानवी चूका आणि तोतयांकडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या युक्त्या टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून एका उपयुक्त सॉफ्टवेअरचा जनक.

इंडियन नेव्ही, BARC, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, ई शासकीय खात्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारे योगदान

“TECH IT EASIER” या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे जनक. या वर्कशॉपमार्फत मोफत उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानातील काही गोष्टींचा फायदा विविध उद्योगांना व्हावा यासाठी उद्योजकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.

उद्योगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर का व कसा करावा यासंबंधी मुंबई व पुण्यामध्ये उद्योजकांना सेमिनार मधून मार्गदर्शन.

SRS Software, WealthGuide व SCA Academy इथे तंत्रज्ञान सल्लागार म्हणून कार्यरत.

जीवनरंग चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे विश्वस्त आणि मार्गदर्शक

“महाराष्ट्र बिजनेस क्लब (MBC)” चे सहसंस्थापक, विश्वस्त व माजी अध्यक्ष.

अर्थसंकेततर्फे मराठी बिजनेस क्लबच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी “बेस्ट लीडर” म्हणून अवॉर्ड

आचार्य कॉलेज, चेंबूर इथे “बेस्ट अल्युमनाय” पुरस्काराने सन्मानित

techiteasiermarathi.blogspot.com आणि techiteasierenglish.blogspot.com या प्रसिद्ध तंत्रज्ञान ब्लॉगचे लेखक

BSS, गोल्डन उद्योगनीती, V- Alliance व विविध बिजनेस ग्रुपमध्ये तंत्रज्ञानविषयक सेमिनारमधून मार्गदर्शन

विविध शाळा, कॉलेजेस व कंपनीमध्ये तंत्रज्ञानावर मार्गदर्शक म्हणून सेमिनार