समीर दत्ताराम पडवळ

उद्योजक, प्रेरणादायी वक्ता, ​सॉफ्ट-स्किल ​ट्रेनर, गुंतवणूक तज्ज्ञ आणि आर्थिक सल्लागार

श्री. समीर पडवळ हे एक उद्योजक, प्रेरणादायी वक्ता, ​सॉफ्ट-स्किल ​ट्रेनर, गुंतवणूक तज्ज्ञ आणि आर्थिक सल्लागार असून गेले ११ वर्षे ते विविध विषयांवर तरूणांना, विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करत आहेत. आजपर्यंत त्यांनी ३५००० पेक्षा जास्त लोकांना वेगवेगळ्या विषया अंतर्गत सेमिनार आणि कार्यशाळेमधून मार्गदर्शन दिले आहे.

अर्थवेध वेल्थ या संस्थेचे संस्थापक आणि संचालक असून गुंतवणूकदारांना आर्थिक सक्षम करत आहेत. तसेच “गुंतवणुकीची पाठशाळा” या कार्यशाळे मार्फत शेकडो लोकांना गुंतवणुकीची बाराखडी शिकवण्याचं कार्य मोफत करत आहेत.

“श्री कॉमर्स अकॅडेमी” हि एक चेंबूर, मुंबईमधील नावाजलेली कोचिंग इन्स्टिटयूट असून गेल्या १२ वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी “आय लीड ट्रेनिंग अँड कंसलटिंग” या उपक्रमा अंतर्गत मदत करत आहेत.

पोलिसांमध्ये नव्याने भरती होणाऱ्या लोकांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी सॉफ्ट-स्किल कौशल्यावर आधारित महाराष्ट्रातील १० पोलीस ट्रेनिंग सेंटर्स येथे ३-३ दिवसांचे ट्रेनिंग सेशन्स घेऊन पोलिसांना बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक लाभ मिळवून देण्यास मदत केलेली आहे. आजपर्यंत त्यांनी जवळपास १२००० पेक्षा जास्त पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना वरील विषयांवर मार्गदर्शन केलेले आहे.

​एक सक्षम पिढी घडवण्याची ताकद शिक्षकांमध्ये असते आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये शिक्षकांमध्ये विकसित करण्यासाठी ​”सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षक” या कार्यशाळेतून ते ६५०० पेक्षा जास्त शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम करत आलेले आहेत.