Entries by Jeevanrang

व्यवस्थापन रिचार्जर

नमस्कार.   दोन दिवसांपूर्वी आपण सर्वानी पाहिलत श्री.समीर पडवळ यांनी आपल्यामधील EXPIRE होत असलेल्या गोष्टींमध्ये बदल करावयास सुचवले. कारण चांगला बदल होणे हे मानवी जीवनाला आवश्यकच असतो. आज त्याच कडीला जोडून मला आपल्याला एका जापनीज शब्दाबद्दल सांगायला आवडेल तो शब्द म्हणजे ‘कायझेन’ . हा शब्द आपले जीवनमान सुधारण्यास आपणास मदत करेल यांत शंका नाही ‘काईझेन’ […]

जीवन माझे संगीत

संगीताची व्याख्या काय असू शकते हो? संगीत म्हणजे कर्ण मधुर आणि जनरंजन करणाऱ्या अतिप्राचीन भारतीय परंपरा लाभलेल्या गायन, वादन आणि नृत्य यांचा अंतर्भाव असलेल्या श्रेष्ठ कलेस ‘संगीत’ असे म्हणतात. गायन, वादन आणि नृत्य यांचा जेंव्हा सुरेख मिलाप होतो, तेंव्हा ती एक अप्रतिम कलाकृती तयार होते व मनाचा ठाव घेते आणि नेमके त्यालाच आपण ‘हे मला […]

स्वप्न ठरवताना आवश्यक ६ गोष्टी (तुमच्या जगण्याचा हेतू तुम्ही शोधलाय का?)

नमस्कार, मंडळी, आपण खरच खूप भाग्यवान आहोत कि आपण अशा मातीत जन्म घेतलाय ज्या मातीला इतिहासाचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. हीच ती माती ज्यामध्ये एका महत्त्वकांक्षी सरदाराच्या मुलाने आपल्या वडिलांचं स्वप्न उराशी बाळगलं आणि त्याचं रुपांतर एका साम्राज्यात केलं. एक असं साम्राज्य ज्याचं वार्षिक उत्पन्न ४ लाख कोटी इतकं होतं. २६०००० ची फौज, ३६० किल्ले, […]

आयुर्वेद- समजुती व गैरसमजूती – भाग 2

दही… अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणखी एक विषय.. दह्याच्या बाबतीत देखिल खूप गैरसमजूती आहेत.. उदाहरणार्थ.. दही थंड आहे.. रोज जेवणानंतर खाल्लच पाहीजे..अदमुरे दही हे तर फारच उत्तम  इ. हे सर्वच गैरसमज आहेत.. आणि या गैरसमजूती मुळं आपण अनेकदा अनेक आजारांना बळी पडतो.. दही हे थंड नसून उष्ण आहे.. व पचनानंतर अम्लता उत्पन्न करणारे आहे..दही जेवणाबरोबर खाल्ल्यास […]

Thoughts Become Things

आनंद हा शोधण्याचा विषयच नाही पण लोक आनंदाचा शोध घेत असतात. मग आनंद मिळवण्यासाठी वस्तू पाहिजेत, comforts of life पाहिजे, पैसे पाहिजेत. त्यासाठी लोक पैशाच्या मागे धावताना दिसतात. पैशाच्या मागे लागून आनंद मिळतो का दुःख मिळतं ते पैसेवाल्याना  विचारा, तुम्हाला बाहेरून वाटेल हा पैसेवाला आहे, श्रीमंत आहे म्हणजे खूप आनंदात आहे परंतु त्यांची दुःख त्यालाच […]

तुम्हांला काय वाटतं?

परवा काही खाऊ घ्यायला बेकरीत गेले होते. माझ्या आधीच्या ग्राहकांची खरेदी होईपर्यंत मी शांत उभी राहिले. थाेड्यावेळाने एक बाई आली—“मी रिक्षा थांबवलाय, मला लवकर दे” म्हणू लागली. मी सेल्समनला म्हटलं, “माझ्याआधीच्या ग्राहकांचं घेऊन झालंय, तेव्हा आता मला दे.”  त्या बाईने पुन्हा “रिक्षा उभी केलीय, मला आधी दे” म्हटलं. सेल्समनने मला हवे ते पदार्थ बांधून दिले, […]

माझं आभाळ हरवलंय!

माझं आभाळ हरवलंय रितं मन  शोधंत भरकटलं  आता ईथे उंचावर  पोहोचण्यासाठी उंच उंच इमारतीकङे साकङे  घातले किती आर्जवं केलीत या ताठर  खुनशी सुळक्याच्या लोकांनी आणि धारदार टोकांनीच घायाळ  केलय माझ्या  निर्मल निळ्या आकाशाचे अस्तित्व हरवलंय हो आकाश माझं माझ्या इवल्या इवल्या  चांदण्याची थाळी देखील पारखी  झाली  आता जगतोय आभाळाविना  पोरकं झालेलं रितं ….हृदय, भरून घेतलाय […]

खरा ‘पुरुषार्थ’

काल पनवेलवरून घरी जाताना गाडीचा टायर पम्चर झाला. हायवे शेजारी पेट्रोलपंपाला लागून असलेल्या एका पम्चर काढणाऱ्याजवळ गाडी घेवून आलो. तो वयानं तिशीतला असावा. त्याचं काम चालू होतं आणि मी देखरेख करण्यासाठी बाजूला उभा होतो. तो होता पक्का बोलबच्चन. तोंडाची सतत बड़बड़ चालू होती. माझ्याकड़े पर्याय नसल्यामुळे मीही गप्पा चालू केल्या. त्याच्याविषयी विचारपुस चालू केली आणि […]

लिहीते व्हा!

आपल्या आजूबाजूच्या  गोष्टींचे गहीरेपण जेव्हा माणसाला कळतं तेव्हा लिहावंसं वाटत. लिहीताना मनात घोळत असलेला विचार व भावना कागदावर उमटतात तेव्हा मेंदूतली जागा रिकामी झालेली जाणवते. जरा हलकं वाटतं. मनातील कल्पना लिखानाच्या रूपात शब्दामध्ये उतरतात. स्वतःचे विचार लिहीण्यासाठी आपल्याला स्वतःच्या बुध्दीचा वापर करावा लागतो. अर्थात ते स्वतः लिहावं लागतं. आणि आपण पुन्हा चेक करतो आपण लिहीलेलं […]

अंकज्योतिष एक चमत्कार -भाग 2 | प्रारब्ध अंक 1-9 असेल तर काय ?

दिर्घकालीन महत्वकांक्षा पूर्ण होते. ज्या गोष्टी हातात घ्याल त्यात यश मिळते. आर्थिक फायदा व बढती असा चढता आलेख असतो. परंतु अहंकाराने बोलणे टाळावे. भांडण किंवा वाद आवडत नाहीत. जाहिरात न करता शांतपणे काम करणे ही त्यांची पध्दत असते.बाहेरील जग व वातावरण या बद्दलही खूप संवेदनशील असतात. लहान मुले फार आवडतात. या लोकांना सामाजिक कार्याची आवड […]

पहिली उड्डाण

आज मला एका मित्राचा फोन आला. म्हणाला उद्या आई बाबा पहिल्यांदा विमानाने बाहेरगावी जाणार आहेत. तू ज्या एयरलाइन मधे आहेस, त्याच एयरलाइनच बुकिंग आहे. ते उत्साहित आहेत पण पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे थोड़े नर्वस आहेत. विमानपर्यंत जाताना तू जर त्यांच्यासोबत असलास तर थोड़े रिलैक्स होतील आणि आम्हालाही चिंता लागून राहणार नाही. ठरल्या प्रमाणे त्याना विमानतळावर […]

CURATIVE PETITION

There is no word like – curative petition in any  legislative law books. We all know Supreme Court is apex court of the country so what to do if you are not happy with order of Supreme Court of India  .   This question was answered by Supreme Court  by giving the term Curative petition . […]

कुछ इस तरह से मैंने अपनी जिंदगीको आसान कर दिया!

  नमस्कार मित्रांनो, आज धावपळीच्या आणि दगदगीच्या जिवनात सतत यशाच्या किंवा गरजा भागवण्याच्या धडपडीत आनंद हरवलेला दिसतो. जो आनंद आपण बाह्य गोष्टीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो तो खरंतर आपल्या आतच दडलेला असतो परंतू त्यावर आपल्याच आतील बऱ्याच शत्रुंच वर्चस्व असतं आणि हे शत्रु त्या आनंदाला डोकं वर काढू देत नाहीत. त्यापैकी दोन शत्रु म्हणजे- १) […]

‘घर माझ्या स्वप्नांतलं!’

  नमस्कार मंडळी, आजचा विषय थोडा वेगळा आहे पण अत्यंत महत्वाचा आहे. आज मुंबई आणि मुंबई उपनगरात स्वतःचे घर बुक करणे आणि त्याचा ताबा मिळवणे अत्यंत सावधानतेचे झाले आहे. आज सभोवताली फसवणूक करणाऱ्या विकासकांच्या संख्येत वाढ होत आहे. म्हणूनच आपल्या कष्टाची कमाई काळजीपूर्वक गुंतवणे महत्वाचे आहे. “तुमच्या मनातील प्रत्येक शंका जोपर्यंत दूर होत नाही आणि […]

‘रास्ते कहा खत्म होते है जिंदगी के सफर मे’

  एकदा गवतावर अनवाणी चालत होतो. रस्त्याने महागडे बूट घालून चालणारा माणूस बघितला. विचार आला, ‘पायात चप्पल असती तर किती मस्त झालं असतं!’ पुढे चप्पल मिळाली. रस्त्याने चालताना एक सायकल चालवणारा माणूस दिसला. विचार आला, ‘एक सायकल असती तर किती मस्त झालं असतं!’ एखाद वर्षात सायकल मिळाली. सायकल चालवताना एक मोटरर्बाईक  बाजूने गेली. विचार आला, […]

जे जे विदेशी आणि इंग्रजी ते ते उत्तम?

  साधारण 70 ते 80 च्या दशकापासून सुरुवात झाली एक पिढी परदेशात जायला आणि मग हळू हळू विदेशी वस्तुंचा भारतात वापर वाढू लागला. जी गोष्ट अगोदर चैन म्हणून बघितली जायची ती आता गरज झाली किंवा त्याची गरज निर्माण केली गेली. मग त्यानंतर या विदेशी वस्तूंची फॅशन झाली. एखाद्याने आश्चर्याने विचारले अरे नवीन घड्याळ! की त्यावर […]

प्रेरणा रिचार्जर – मला हितशत्रू हवे आहेत!

  सगळ्यांना स्पष्टीकरण देत बसू नका. कारण जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांना त्याची गरज नसते आणि जे तुमचा तिरस्कार करतात त्यांचा तुमच्या सांगण्यावर कधीच विश्वास नसतो. जेव्हा आपण चांगलं काहीतरी करायला लागतो, त्यात यश प्राप्त करायला लागतो, नकळत तुमच्या हितचिंतकांबरोबर हितशत्रूदेखील निर्माण होणारच. ते अटळ आहे. या हितशत्रूंचा तुमच्या प्रत्येक वागणुकीला, प्रत्येक कृतीला विरोध […]

मूड रिचार्जर – शाळा

लहान लहान मुलांच्या मोठ्ठया मोठ्ठ्या मनात आकांक्षांचं पीfक ऊरी , वारं भरल्या कानांत ! त्रास देणारा शेजारचा मित्र पण जवळचा वाटतो आवडणारी मुलगी लांब असून जवळची वाटते ! कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी “गोल्ड्-स्पॉट्”च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी ! “मस्तीखोर” म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी […]

आयुर्वेद- समजुती व गैरसमजूती – भाग 1

  आयुर्वेद म्हणजे काय हे जाणून घेण्यापूर्वी आपण आधी त्याच्याशी मैत्री करूया . आयुर्वेद म्हणलं की सर्वात आधी डोक्यात विषय येतो तो म्हणजे पथ्य . आणि पथ्य म्हणलं की लगेच आपल्या अंगावर काटा येतो. कुठल्याही आईला असं कधी वाटेल का, की आपल्या बाळाने चुकीचे खावे चुकीचे वागावे  …… मुळीच नाही… कारण प्रत्येक आईला आपल्या बाळाचं फक्त […]

पालकत्व रिचार्जर

तुम्हांला काय वाटतं? गेल्या महिन्यात घडलेला प्रसंग. कार्यक्रम आटपून नाशिकहून ट्रेनने येत हाेते. समाेर साताठ वर्षांचा एक मुलगा आईसाेबत प्रवास करत हाेता.  आईच्या कानाशी लागून खाण्यापिण्याच्या त्याच्या काही ना काही डिमांड्स सतत  चालू हाेत्या. आई त्याला हवं ते देत हाेती. त्याचे लाड करत हाेती. विणकाम चालू असताना त्याच्याकडे अधूनमधून माझं लक्ष जात हाेतं. काय झालं […]

ज्ञान रिचार्जर

  काल रविवार असल्याकारणाने मी जरा निवांत दुकानामध्ये  होतो. तेव्हा संजय गोविलकर मला भेटायला आले. संजयजी आल्यानंतर आमच्या कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चा होतच असतात. काल ‘चांदी’ या विषयी गप्पा मारत असतांना मला मागील वर्षी त्यांनी चांदीची उरळी खरेदी करत असतांनाचा प्रसंग आठवला. त्यांनी काही गिफ्ट आलेल्या चांदीच्या मूर्ती आणि चांदीची नाणी व वरचे पैसे […]

ना – त्यांना गृहीत धरताना

आकाशातील ग्रह बघण्यासाठी आपण दुर्बीण वापरतो, ते आहेत तसे पाहतो, ते जसे दिसतात तशीच त्यांच्या रंगावर आणि गुणधर्मांवर चर्चा करतो. आता हे झाले लांबचे पाहणे. जे लांब आहे ते आपण आहे तसे पाहतो पण जे जवळ आहे ते म्हणजे आपली मुले व त्यांच्या सोबतचे आपले नाते-संबंध यानाही आपण तेच परिमाण वापरतो का? उलटपक्षी जे जवळ […]

मूड रिचार्जर – असे प्रसवले गीत

मंडळी , सप्रेम नमस्कार ! आज मी तुम्हाला ५७ वर्षं मागे नेतोय….. : साल १९६० : या वर्षी एकूण ३१८ चित्रपट प्रदर्शित झाले — ११८ हिंदी , १५ मराठी , ६४ तामिळ , ५४ तेलगू , ३६ बंगाली व ३१ इतर भाषीय. या ११८ हिंदी चित्रपटातील एका चित्रपटातील एका गाण्याची हि हकिगत….. चित्रपटात ‘हमीर‘ रागावर […]

नातेसंबंध रिचार्जर

एकदा एक वृद्ध माणूस आपल्या २५ वर्षांच्या तरुण मुलाबरोबर अंगणातल्या बाकावर बसला होता. इतक्यात समोरच्या कुंपणावर एक कावळा येऊन बसला. वृद्धाने मुलाला विचारलं, “बाळा ते काय आहे?” मुलाच्या लक्षात आलं की वडील कावळ्याबद्दल विचारताहेत. “कावळा आहे.” कपाळाला आट्या पाडत त्याने उत्तर दिलं. काही सेकंदांच्या अंतराने वडिलांनी पुन्हा कापऱ्या आवाजात विचारलं, “बाळा, ते काय आहे?’ “कावळा […]

मस्त जगा – इच्छामुक्त

‘रास्ते कहा खत्म होते है जिंदगी के सफर मे‘   एकदा गवतावर अनवाणी चालत होतो. रस्त्याने महागडे बूट घालून चालणारा माणूस बघितला. विचार आला, ‘पायात चप्पल असती तर किती मस्त झालं असतं!’ पुढे चप्पल मिळाली. रस्त्याने चालताना एक सायकल चालवणारा माणूस दिसला. विचार आला, ‘एक सायकल असती तर किती मस्त झालं असतं!’ एखाद वर्षात सायकल […]

व. पु. काळेंची आयुष्य बदलून टाकणारी २५  वाक्ये

मित्रांनो, माझ्या लेखन क्षेत्रातील गुरुंपैकी एक म्हणजे व. पु. काळेसर. आयुष्याला कंटाळलेल्या माणसाने त्यांचं लिखाण वाचावं, त्याला नक्कीच नव्याने जगण्याची खुमारी येईल. त्यांच्या विविध पुस्तकांमधून वेचून काढलेले हे २५ विचार. नक्की वाचा. आयुष्य आणखी रुचकर वाटेल.   १. गगनभरारीचं वेड: कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ […]

धावण्याच्या एका शर्यतीत एकदा,  एकाने थांबायचे ठरवले

धावण्याच्या एका शर्यतीत एकदा,  एकाने थांबायचे ठरवले वेडा, मूर्ख म्हणून, इतर धावणाऱ्यांनी त्याला हिणवले अरे धाव नाहीतर मागे रहाशील, मग भविष्याची तरतूद केव्हा करशील आभाळ कोसळले म्हणून धावणाऱ्या सशामागे आम्ही निघालो लोटून दे स्वतःला नाहीतर फुकटचा मरशील धावणाऱ्या एकाला, मग नि धावतच विचारले? आभाळ कोसळताना तू रे कधी पाहिले लगेच तो म्हणाला ‘मी नाही हो […]

आम्ही भारतीय!

आज देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे उलटली. तरीही जाती, धर्म, पंथ, यावरून दंगे व वाद होतच आहेत. आपली नेमकी हीच दुखरी नस तेंव्हा इंग्रजांना लक्षात आली होती. त्यांना कळलं हे लोक धर्मावरून कधीच एकत्र होणार नाहीत. त्यामुळेच त्यांनी भारतातील निरनिराळ्या धर्मांमध्ये भांडणे लावून दिली फोडा आणि राज्य करा हेच तर त्यांचं मुख्य धोरण होते. आणि […]

सर्वधर्म समदृष्टी होई सुजलाम सुफलाम सृष्टी

नमस्कार, गेले बरेच दिवस WHATSAPP वर जातीयवादीमुद्द्यावरून अनेक मेसेजेस गाजतायत. समाजातील प्रत्येक स्तर आपली जात श्रेष्ठ कशी हे पटवून देताना इतर जातींना खाली दाखवणारे अनेक मेसेज बनवत आहेत व सोशल मिडियाचा वापर करताना दिसत आहेत. दुर्दैवाने ‘आम्ही सारे भारतीय आहोत’ हे फक्त आणि फक्त प्रतिज्ञेपुरतेच मर्यादित राहिले आहे. ही प्रतिज्ञा आपण म्हणतो तेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा […]

सोशल मिडियावर टाळायच्या या १८ गोष्टी (भाग २)

आज सोशल मिडीयाचं प्रचंड वारं आहे. सोशल मिडीयावर नसणं म्हणजे अक्षरशः मागसल्याचे लक्षण मानले जाते. गेल्या १० वर्षांत आपल्या देशात सोशल मिडीयाचं वादळ उठलं आहे. या सोशल मिडियाचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू आहेत. बरेच जण सोशल मिडीयाचा चुकीचा वापरच जास्त करताना बघत आलोय, म्हणून हा लेख लिहावासा वाटला. सोशल मिडीया काय करू नये […]